Put black on brides returning from weddings; Six members of the same family were killed and 14 others were injured in the accident

सिल्लोड शहरानजीक असलेल्या मोढा फाट्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला घाटशेंद्रा येथून लग्नाहून परतत असलेल्या वऱ्हाडींच्या पिकअपने धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत(Put black on brides returning from weddings; Six members of the same family were killed and 14 others were injured in the accident).

    औरंगाबाद : सिल्लोड शहरानजीक असलेल्या मोढा फाट्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला घाटशेंद्रा येथून लग्नाहून परतत असलेल्या वऱ्हाडींच्या पिकअपने धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत(Put black on brides returning from weddings; Six members of the same family were killed and 14 others were injured in the accident).

    मंगरूळ येथील सोनवणे कुटुंबीय कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे लग्नाला गेले होते. बुधवारी लग्न पार पडले. लग्नानंतर लग्नाची सर्व विधी कार्यक्रम उरकून रात्री एक वाजण्याच्या सुमारास सदरील मंडळी गावाकडे परत येत असताना मोढा गावाजवळील फाट्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला वऱ्हाडींची पिकअप धडकली.

    अपघातात अशोक संपत खेळवणे (वय ५२), संगीता खेळवणे (वय ३५), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (वय ४५), संजय संपत खेळवणे (वय ४२), जिजाबाई गणपत खेळवणे (वय ६०), रंजनाबाई संजय खेळवणे (वय ४०) असे एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार झाल्याची नावे आहेत. तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.