‘शिवसेना अंगार है – बाकी सब भंगार है’, बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे जोरदार निदर्शने

या आंदोलनात "काळ संकटाचा आहे- वारसा संघर्षाचा", "आम्ही शिवसैनिक शिवसेनेसोबत" अशा प्रकारचे फलकांच्या माध्यमातून शिवसैनिकांनी आपले भूमिका मांडली.

    औरंगाबाद – महाराष्ट्रातील राजकारणात दोन दिवसापासून राजकीय घडामोडी सुरू असून बऱ्याच आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनाही शिवसैनिकाच्या रक्ताने, घामाने, अनेक शिवसैनिकांच्या त्यागामुळे मोठी झालेली आहे, वाढलेली आहे. कोणी कुठेही गेले तरी सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहे, शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे आहे. यासाठी बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना संभाजीनगर च्या वतीने शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज (दी. २२) क्रांतीचौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शहरातील व ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

    शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे अंगार है बाकी सब भंगार है, उद्धव साहेब संघर्ष करा शिवसैनिक सोबत आहे, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचे करायचे काय – खाली मुंडके वर पाय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बऱ्याच आमदाराने शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेले पाहावयास मिळत होते बऱ्याच शिवसैनिकांना राग अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही अशा प्रकारच्या भावना शिवसैनिक व्यक्त करत होते.

    या आंदोलनात “काळ संकटाचा आहे- वारसा संघर्षाचा”, “आम्ही शिवसैनिक शिवसेनेसोबत” अशा प्रकारचे फलकांच्या माध्यमातून शिवसैनिकांनी आपले भूमिका मांडली.

    यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे माजी महापौर नंदकुमार घोडेले उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, बप्पा दळवी, अशोक शिंदे ,अवचित वळवळे, कृष्णा डोणगावकर, विनायक पांडे, अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, तालुकाप्रमुख केतन काजे, हनुमान भोंडवे, दिनेश मुथा, सुभाष कानडे, राजू वरकड ,राजेंद्र ठोंबरे,तालुका संघटक सुदर्शन अग्रवाल, डॉ. अण्णा शिंदे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, जिप सभापती अविनाश गलांडे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय निकम, जी प सदस्य मानाजी मिसाळ, पंचायत समिती सभापती सुनील केरे आदि उपस्थित होते.