शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट; औट्रम घाटातील बोगदा संदर्भात १ लाख सह्यांचे निवेदन सुपूर्द

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेतली. यावेळी प्रधान सचिव आशिषकुमार सिंग आणि प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासमवेत सुद्धा बैठक घेतली. या बैठकीत चाळीसगाव रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) दरम्यान औट्रम घाटातील बोगदा संदर्भात सकारात्मक चर्चा केली. तसेच संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या १ लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

    औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेतली. यावेळी प्रधान सचिव आशिषकुमार सिंग आणि प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासमवेत सुद्धा बैठक घेतली. या बैठकीत चाळीसगाव रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) दरम्यान औट्रम घाटातील बोगदा संदर्भात सकारात्मक चर्चा केली. तसेच संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या १ लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, राष्ट्रीय महामार्ग चेयरमन संधू (नवी दिल्ली), प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते.

    दरम्यान केंद्र सरकार, नीती आयोग, मुख्यमंत्री कार्यालय या सर्वांचे समन्वय व तपशील मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे असतो. त्या अनुषंगाने मुंबई येथे त्यांची भेट घेतल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. यावेळी बैठकीत सीताराम कुंटे यांनी राज्यसरकार याकामी सर्वोतोपरी मदत करेल, अशी ग्वाही खैरेंनी दिली.

    राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत कन्नड-चाळीसगाव घाटातील बोगदा होणे गरजेचे आहे. याकरिता ६ हजार कोटीचा खर्च असून हा बोगदा खांन्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्याचे महत्व लक्षात घेता आपण या कामी केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, ऍड. आशुतोष डंख, शिवसेना तालुका संघटक, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, सरपंच अशोक दाबके यांची उपस्थित होते.