विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगसाठी ‘स्मार्ट सिटी’चे लाईट हाऊस प्रकल्प

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमधील तरूण, तरूणी, विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी (Aurangabad Smart City Development Corporation) (ASCDCL) प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एएससीडीसीएल) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन(एलसीएफ) लाईट हाऊस प्रकल्प सुरू केले आहे.

    औरंगाबाद (Aurangabad). सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमधील तरूण, तरूणी, विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी (Aurangabad Smart City Development Corporation) (ASCDCL) प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एएससीडीसीएल) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन(एलसीएफ) लाईट हाऊस प्रकल्प सुरू केले आहे.

    हा प्रकल्प सुरू करण्यासाठी फेब्रुवारी मध्ये औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एएससीडीसीएल) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन(एलसीएफ) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला़ होता आणि एप्रिल मध्ये लाइटहाऊस चं पाहिलं बॅच सुरू झाला. ह्यात स्टरलाइट टेक्नोलॉजीस आर्थिक मदत करत आहे.

    मनपा प्रशासक तथा एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय म्हणाले की शहरातील नागरीकांचे जीवनमान उंचावणे, तरूणाईला स्किल डेव्हलपमेंटचे धडे मिळावे याहेतूने तीन्ही संस्थांनी पुढाकार हा प्रकल्प सुरू केला आहे़. लाईटहाऊस महानगर पालिका क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमधील तरूणांना प्रशिक्षण देण्यात येत्या पाच वर्षांसाठी हा करार असणार आहे़. या प्रकल्पसाठी आवश्यक असणारी भुमिका व जबाबदारी ‘एलसीएफ’ची  आहे़ प्रकल्पासाठी, आवश्यक खर्च सुरक्षित करण्याची जबाबदारी एलसीएफची आहे.

    प्रकल्पाची अंमलबजावणी होण्यासाठी एलसीएफ सहाय्य करणार आहे़ सर्व टप्प्यात प्रकल्प संकल्पित व कार्यान्वित करण्यासाठी एएससीडीसीएल एलसीएफला मदत करत आहे. लाईट हाऊस मध्ये विद्यारथ्यांचे फाउंडेशन कोर्स, समुपदेशन कोर्स, कौशल्य विकास ट्रेनिंग आणि प्लेसमेंट करण्यात येत आहे.

    लाइटहाऊस प्रकल्प रबिवण्यासाठी महानगरपालिकेने ने एन 5 स्थित कम्युनिटी सेंटर एएससीडीसीएल चा सुपूर्द केले आहे. एएससीडीसीएल च्या वास्तुविशारद स्नेहा बक्षी ह्या इमारती ला एल सी एफ सोबत नवीन रूप देत आहे. ह्या प्रकल्पासाठी लागणारे कम्प्युटर व इतर आयटी साहित्य एएससीडीसीएल द्वारे पुरविल्या जाणार आहे. ह्यात एकूण 70 लाख रुपये चा वाटा औरंगाबाद स्मार्ट सिटी उचलत आहे. एएससीडीसीएल ची सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर आणि इमरान खान ह्या प्रकल्पात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे ह्यांचा मार्गदर्शनाखाली लाईट हाऊस प्रकल्पावर काम करत आहे.