मॅजिकच्या कार्यविस्ताराला वेग ; शंभरावर स्टार्टअपसला प्रत्यक्ष सहकार्य

मराठवाड्यातील स्टार्टअपना चालना देण्यासाठी 'चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रिकल्चर' (सीएमआयए) च्या सदस्यांनी पुढाकार घेतला. १० ऑक्टोबर २०१६ रोजी सीएमआयएच्या सदयांनी 'मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल' (मॅजिक)ची स्थापना केली. कंपनी कायद्यात सेक्शन ८ अर्थात नॉट फॉर प्रॉफिट कंपनी म्हणून नोंदणी झाल्यानंतर आता मॅजिकचे काम मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या अधिपत्याखाली चार पूर्णवेळ सदस्यांच्या उपस्थितीत सुरु झाले आहे. याचा फायदा मॅजिकचे मॅजिक आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचवण्यास होत आहे.

  औरंगाबाद : ‘मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल’ (मॅजिक)ची वाटचाल अवघ्या सहा वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु झाली असून देशांतर्गत नवउद्योजकांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवउद्योजक आणि स्टार्टअपला मार्गदर्शन आणि सहाय्य मिळत आहे. विशेष म्हणजे इनक्युबेशन, मेटॉरिंग, नेटवर्क आणि एसएमई अ‍ॅक्सिलेटर (निर्मिती सहाय्य, मार्गदर्शन, पूरक जाळे, लघु-मध्यम व्यवसायाला गती) या चतुःसुत्रीच्या आधारावर मॅजिक एक स्वतंत्र सेक्शन ८ कंपनी म्हणून कार्यरत झाल्याने कार्यविस्ताराला आता वेग मिळायला सुरुवात झाली आहे.

  मराठवाड्यातील स्टार्टअपना चालना देण्यासाठी ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रिकल्चर’ (सीएमआयए) च्या सदस्यांनी पुढाकार घेतला. १० ऑक्टोबर २०१६ रोजी सीएमआयएच्या सदयांनी ‘मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल’ (मॅजिक)ची स्थापना केली. कंपनी कायद्यात सेक्शन ८ अर्थात नॉट फॉर प्रॉफिट कंपनी म्हणून नोंदणी झाल्यानंतर आता मॅजिकचे काम मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या अधिपत्याखाली चार पूर्णवेळ सदस्यांच्या उपस्थितीत सुरु झाले आहे. याचा फायदा मॅजिकचे मॅजिक आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचवण्यास होत आहे.

  मॅजिकने विस्तारीकरणासाठी नियोजनबध्द पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नजिकच्या भविष्यात मॅजिक आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर या सीएआए सदस्यांनी स्थापित केलेल्या दोन संस्थांमधील सहाकार्याने इनोव्हेशन आणि स्टार्टअपचे काम अधिक मोठ्या स्तरावर नेण्याचा मानस आहे. नविन उपक्रमांचे नियोजन आणि ते राबवण्याची तयारी सुरु झाली आहे. कोरोना काळात मॅजिकने विविध ऑनलाईन उपक्रम राबवत राष्ट्रीय पातळीवर शंभरपेक्षा जास्त नवउद्योजकांंना प्रत्यक्ष सहकार्य आणि मार्गदर्शन केले आहे. विविध पातळीवरील स्टार्टअप बरोबरच मेंटर्स, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि व्यवसाय मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांचे नेटवर्वâ आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवण्यात येत आहे. पस्तीस पेक्षा जास्त स्टार्टअप इको सिस्टीम पार्टनरबरोबर मॅजिकचा करार हेही एक महत्वाचे पाऊल आहे.

  मॅजिक बरोबर जोडल्या गेलेल्या स्टार्टअपस्च्या सक्षमिकरणासाठी सन २०२१- २२ साठी नियोजनबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. विविध वंâपन्यांचा सामाजिक दायित्व निधी, प्रायोजक आणि शासकीय अनुदान यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उभा करुन स्टार्टअपला जास्तीत जास्त प्रोत्साहन तसेच अर्थसहाय्य कसे करता येतील याचे प्रयत्न सुरु आहेत.

  एक कोटी रुपयांची गुंतवणूक करुन मॅजिकच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मॅजिकचे कार्यकारी मंडळ सक्रिय आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यशाळा, प्रशिक्षण वर्गांमध्ये सहभाग नोंदवून मॅजिकच्या व्यवस्थापनात नव्याने दाखल झालेल्या व्यवस्थापनातील सदस्यांनी स्वतःच्या क्षमता अधिकाधिक विकसीत करण्याचा प्रयत्न केला ज्याचा थेट फायदा मॅजिक तर्फ प्रशिक्षण दिल्या जाणा-या नवउद्योजकांना मिळणार आहे.

  गोईंग ग्लोबल

  जागतिक दर्जाच्या सेवा जोपर्यंत मिळवून देणार नाही तोपर्यंत दर्जेदार उद्योग उभे राहू शकणार नाहीत हे मॅजिकच्या टिमने जाणले होते. म्हणूनच जागतिकस्तरावरचे मेंटॉर गर्जे महाराष्ट्रच्या माध्यमातून शोधले. गर्जे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन अकादमी बरोबर झालेला सामंजस्य करार मॅजिकसाठी मोलाचा ठरला त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेंटॉरचे मार्गदर्शन मराठवाड्यातील नव्या उद्योजकांना मिळू लागले आहे तसेच या करारामुळे मराठवाड्यातील प्रतिथयश उद्योजक आंतरराष्ट्रीय पातळीवर मेंटॉर म्हणून ओळखले जाणार आहेत. गोईंग ग्लोबलचा प्रवास येणाऱ्या काही वर्षात नव उद्योगनिर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि निर्यातीलाही प्रोत्साहन देणार आहे.

  मॅजिक टीम
  सुनील रायठठ्ठा मिलिंद वंक, मुकुंद भोगले, प्रसाद कोकिळ, आशिष गर्दे, सुरेश तोडकर, प्रशांत देशपांडे, केदार देशपांडे, रितेश मिश्रा, रोहित दाशरथे मॅजिकची जबाबदारी सांभाळतात. व्यस्त दिनक्रमातून नव्या संकल्पना, नवउद्योजक यांना उभे करण्याचे करण्याचे काम करत आहेत.