परिवहनमंत्र्यांनी मागे झालेल्या संपानंतर मागण्या मान्य करण्याचे सांगितले होते. मात्र, एसटी कामगारांच्या कोणत्याच प्रकारच्या मागण्या अजूनपर्यंत मान्य न झाल्याने एसटी कामगार संघटनेचा आजपासून पुन्हा संपाला सुरुवात झाली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयासमोर बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांनी एकत्रपणे आजपासून पुन्हा संप सुरू केला आहे.
परिवहनमंत्र्यांनी मागे झालेल्या संपानंतर मागण्या मान्य करण्याचे सांगितले होते. मात्र, एसटी कामगारांच्या कोणत्याच प्रकारच्या मागण्या अजूनपर्यंत मान्य न झाल्याने एसटी कामगार संघटनेचा आजपासून पुन्हा संपाला सुरुवात झाली आहे.
काही कर्मचारी संपाला कायम असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, आता संपूर्ण बडतर्फ कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संप सुरू केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संप मागे होणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनेने आज घेतली. याबाबतची माहिती एसटी कर्मचारी संघटनेने आज दिली आहे.