Start teaching classes by following the Kovid rules; MLA Ambadas Danve's demand to the District Collector

आमदार दानवे यांनी आगामी काळातील राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांसाठी इतर राज्यात तयारी सुरू झाली असून या तयारीत आपल्या राज्यातील विद्यार्थी मागे पडण्याचा धोका असून ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आवश्यक ती यंत्रसामग्री इंटरनेट सेवा सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी 17 ते 38 वर्ष वयोगटातील असून त्यांना शासकीय मार्गदर्शक तत्त्वे व आरोग्यविषयक जागरूकता आहे.

    औरंगाबाद : जागतिक महामारी covid-19 च्या संकटामुळे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले यात संभाजीनगर जिल्ह्यातील शिकवणी वर्गांना सुद्धा निर्बंध लावण्यात आले आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याचा गांभीर्याने विचार करून औरंगाबाद जिल्ह्यातील शिकवणी वर्ग सुरू करावे अशी मागणी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे.

    याविषयी चर्चे मध्ये आमदार दानवे यांनी आगामी काळातील राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांसाठी इतर राज्यात तयारी सुरू झाली असून या तयारीत आपल्या राज्यातील विद्यार्थी मागे पडण्याचा धोका असून ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आवश्यक ती यंत्रसामग्री इंटरनेट सेवा सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी 17 ते 38 वर्ष वयोगटातील असून त्यांना शासकीय मार्गदर्शक तत्त्वे व आरोग्यविषयक जागरूकता आहे.

    तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंधही शिथिल करण्यात आलेले आहे त्यामुळे शासनाच्या covid-19 या आजाराच्या प्रसारास प्रतीबंधीत करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यात शिक्षक, कर्मचारी यांचे लसीकरण मास्क, सॅनिटायझर वापरणे ,सार्वजनिक अंतर ठेवणे या नियमावलीचे कठोर पालन, अंमलबजावणी हमी देण्यात येईल.

    यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसानीचा गांभीर्याने विचार करून औरंगाबाद जिल्ह्यातील शिकवणी वर्ग सुरू करावे अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. आजच्या बैठकीत शिकवणी वर्ग सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनीही सकारात्मकता दाखवली आहे.

    याप्रसंगी प्रा. रवींद्र बनसोड, प्रा. दीपक देशमुख ,डॉ. भास्कर शिंदे, प्रा. यशवंत चव्हाण ,प्रा.अभिजीत पेशकार ,प्रा. चंद्रकांत शेजुळ योगेश देशमुख यांची उपस्थिती होती.