…मग ठाकरे सरकार पडणार; रामदास आठवलेंचा दावा

युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. पण, शिवसेना युपीएचा घटक आहे का? असा सवालच त्यांनी उस्थित केला आहे. शिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे. लवकरच . काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार असा दावा आठवलेंनी केला आहे.

औरंगाबाद :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पून्हा एकदा ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार असे आठवलेंनी म्हंटले आहे.

युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. पण, शिवसेना युपीएचा घटक आहे का? असा सवालच त्यांनी उस्थित केला आहे.

शिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे. लवकरच . काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार असा दावा आठवलेंनी केला आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल असेही आठवले म्हणाले.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावलेली नोटीस, शेतकरी आंदोलन अशा विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली.