पूर्णा नदीच्या पात्रात 6 किलोमीटर पायी जात मंत्री बॅरेजेसच्या नियोजीत जागेची अब्दुल सत्तारांनी केली पाहणी

सिल्लोड ते कन्नड हद्दीपर्यंत पूर्णा नदीच्या पात्रात एकूण 7 बॅरेजेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च अखेर बॅरेजेस उभारण्यासाठीचे सर्व प्रशासकीय कारवाई पूर्ण होवून येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

    औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे आज अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत भवन ते केऱ्हाळा खोडकाईवाडी असे जवळपास 6 किलोमीटर नदीपात्रात पायी चालत बॅरेजेसच्या नियोजीत जागेची पाहणी केली.

    सिल्लोड ते कन्नड हद्दीपर्यंत पूर्णा नदीच्या पात्रात एकूण 7 बॅरेजेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च अखेर बॅरेजेस उभारण्यासाठीचे सर्व प्रशासकीय कारवाई पूर्ण होवून येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 33 किलोमीटर पर्यंत पाणी अडवून यातून 54 टक्के सिंचन क्षेत्रात वाढ होईल यामुळे निश्चितपणे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.