तरुणाने गिळला टूथब्रश, घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन काढला बाहेर

औरंगाबाद : आपण सगळ्यांनी अनेकदा लहान मुलांनी टाचण्या, पिना, गोट्या बटण, बॅटरीचा सेल अथवा तत्सम वस्तू गिळल्याचे ऐकले असेल.मात्र एका ३३ वर्षाच्या व्यक्तीने चक्क टूथब्रश (Toothbrush) गिळला. हा प्रकार औरंगाबाद येथे असे घडले आहे. अखेर त्याच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन हा ब्रश बाहेर काढण्यात आला. इतक्या मोठ्या वयाच्या व्यक्तीकडून असा प्रकार घडूच कसा शकतो याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तरुणाचे नाव समजू शकले नाही. या तरुणाने टूथब्रश गिळला. त्यानंतर त्याला त्याच्या पोटात काही टोचत असल्याचे जाणवले. सुरुवातीला त्याने दूर्लक्ष केले. पोटात कमालीच्या वेदना सुरु झाल्या. सुरुवातीला त्याने त्या सहन केल्या. काही वेळाने त्या वेदना असहय्य झाल्या. आता त्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लख नव्हता. त्याने जाऊन डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी तपासले असता त्याच्या पोटात काहीतरी लांब वस्तू असल्याचे जाणवले. डॉक्टरांनी एक्सरे काढला असता पोटात टूथब्रश सदृश्य वस्तू असल्याचे आढळले. डॉक्टरांनी सिटीस्कॅन करुन शस्त्रक्रिया केली. त्याच्या पोटातून बाहेर काढलेली वस्तू टूथब्रशच होती. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती ठिक आहे. त्याने टूथब्रश गिळलाच कसा आणि का या प्रश्नाची उत्तरे मात्र अनुत्तरीतच आहेत. धक्कादायक असे की हा टूथब्रश साधा नव्हता तर चक्क अर्धा फूट लांब होता.