Rebellion in graduate elections; Pankaja Munde supporters also filed nomination papers

बीड : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यतील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी झाली आहे. ही चोरी करणारा भामटा राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेचा पती निघाल्याने खळबळ उडाली आहे

परळी नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकाचा पतीचा या चोरीत मोठा हात आहे. सध्या तो फरार असून मंगलदादा असे त्याचे नाव आहे.  त्याच्या इतर चार सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेले चारपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा असल्याचे समोर आले आहे. फरार आरोपी असलेल्या मंगलदादाचा तपास ग्रामीण पोलीस करत आहे. १७ ऑक्टोबर २०२० ला ही चोरी झाली होती.

वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड अशा विविध साहित्यांवर चोरटयांनी डल्ला मारला. या चोरीमध्ये एकूण ३७ लाख ८४ हजार रुपयांचं साहित्य चोरट्यांनी लंपास केल आहे.

या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख रा. परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मंगलदादा हा नगरपरिषदेच्या नगरसेविकेचा पती आहे. आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत.