औरंगाबादमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
औरंगाबादमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

जागतिकीकरणाच्या आजच्या काळातील स्पर्धेत शिक्षण क्षेत्रानेही मागे राहुन चालणार नाही. गुणवत्ता आणि व्यवासयिक असे कॉर्पोरेट क्षेत्राने मोठे फेरबदल केले. विद्यापीठानेही या क्षेत्राप्रमाणे फेरबदल करने गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.

औरंगाबाद : जागतिकीकरणाच्या आजच्या काळातील स्पर्धेत शिक्षण क्षेत्रानेही मागे राहुन चालणार नाही. गुणवत्ता आणि व्यवासयिक असे कॉर्पोरेट क्षेत्राने मोठे फेरबदल केले. विद्यापीठानेही या क्षेत्राप्रमाणे फेरबदल करने गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थिती बुधवारी व्यवस्थापन परिषद कक्षात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ,  कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, संयोजक संजय शिंदे आदींची उपस्थिती होती.

१ जानेवारी २०२० पासून ते आजपर्यंत विद्यापीठाने राबविलेल्या विविध उपक्रमांची तसेच नवीन वर्षातील उपक्रम याबदलची माहिती दिली. ते म्हणाले, १ जानेवारी पासून ‘फाईल ट्रॅकिंग सिस्टीम‘ सुरु करण्यात आली. त्यानंतर पारदर्शकता, गतिमानता व सुसुत्रपणा आला आहे. येत्या १ जानेवारीपासून ‘लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम‘ सुरु करण्यात येणार आहे, अशी माहितीही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

या पध्दतीत सर्व कर्मचारी व प्राध्यापक यांचा रजेचा अर्ज, मान्यता, नोंद हे सर्व ऑनलाईन असणार आहे. ‘कोविड‘च्या काळात तीन महिने विद्यापीठे महाविद्यालये बंद होती. मात्र, अध्ययन, अध्यापन आणि संशोधन प्रक्रिया आम्ही बंद पडू दिली नाही. विविध अधिकार मंडळाच्या बैठका ऑनलाईन घेण्यात आल्या. १ जून पासून आजपर्यंत १८५ संशोधकाचा पीएचडी व्हायवा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आले. ही पध्दत पुढील काळातही सुरुच ठेवण्यात येणार आहे.

विदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘फॉरेन स्टुडटंस सेल‘ स्थापन करण्यात आल्यानंतर यंदा १० देशातील ११५ विदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ‘एम.फिल‘ संपुर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन घेण्यात आली. १७ विभागात १ हजार १७४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ‘सीईटी‘ दिली. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या याद्याही घोषीत झाल्या आहेत.

विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्राने १० कोर्स ऑनलाईन घेतले. यात ३४० प्राध्यापक सहभागी झाले. तर ३१७ साधन व्यक्तींनी त्यांना मार्गदर्शन केले. विविध विभागात एकत्रित वेतनावर १८ सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.

विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभागात प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन असून ३१ डिसेंबर हा शेवटच्या दिवस आहे. पदवी-पदवीत्तर परीक्षाही दोन्ही पद्धतीने सुरळीत पार पडल्या. एकंदरीत विद्यापीठाची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे समाधान आहे, असे कुलगुरु म्हणाले.

गेल्या चार वर्षापासून रखडलेली पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात (पेट-५) ही १ जानेवारीपासून राबविण्यात येणार आहे. ‘एम.फिल‘चा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे ‘पेट‘ची संपुर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन घेण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

१ जे ११ जानेवारी दरम्यान ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. तर, ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट‘ पहिला पेपर घेण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषीत करण्यात येईल. तर २१ फेब्रुवारी रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल. तर १४ फेब्रुवारी रोजी निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २८ फेब्रुवारी रोजी लागेल. प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील. पेट उत्तीर्ण सतेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी मार्चमध्ये पीएच.डीसाठी नोंदणी तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४२ विषयात ‘पेट‘ होणार असून विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे, असेही कुलगुरु म्हणाले.