साधू आणि गावकऱ्यांमध्ये पुन्हा राडा ; तुफान दगडफेक करीत जीवघेणा हल्ला

श्रीराम टेकडीवरील नागा साधू महंत गणेशपुरी महाराज ( Ganeshpuri Maharaj ) यांच्यावर तुफान दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महाराज गंभीर झालेल्या महाराजांना भक्तांनी औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पैठण : पैठण तालुक्यातील ( Paithan taluka ) मेहरबान तांडा येथील शेकडो गावकऱ्यांनी शुक्रवारी लाठ्या काठ्यांसह महंत साधूंवर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीराम टेकडीवरील नागा साधू महंत गणेशपुरी महाराज ( Ganeshpuri Maharaj ) यांच्यावर तुफान दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महाराज गंभीर झालेल्या महाराजांना भक्तांनी औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला असून गावकरी आणि भक्तांकडून एकमेकांवर गंभीर आरोप (Accused) करण्यात आले आहेत.

शुक्रवारी मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर निलजगाव येथील गावकरी दर्शनासाठी मेहरबान नाईक तांडा येथील श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी गेले होते. या दरम्यान दिंडीतील गावकरी व टेकडीवरील नागा साधू महंत गणेशगिरी महाराज यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले व गावकरी आक्रमक झाले. यानंतर महंत गणेशपुरी महाराज दोन्ही हातात तलवार घेऊन गावकऱ्यांसमोर उभे राहिले. महाराजांनी तलवार काढल्यानंतर गावकऱ्यांनी महाराजांवर दुरूनच तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत महाराज गंभीर जखमी झाले.

महाराजांनी अरेरावी केली म्हणून…

दिंडीतील महिला टेकडीवर फराळ करण्यासाठी बसल्या असता महाराजांच्या मालकीची एक गाय या महिलांमध्ये घुसली. महिलांना त्रास होऊ नये म्हणून एका गावकऱ्याने तेथून गाय हुसकावून लावली. गायीला हुसकावून लावल्याचा महाराजांना राग आला. त्यांनी गाय हुसकावणाऱ्या गावकऱ्यास दोन काठ्या मारल्या. याचा जाब विचारताच महाराज अरेरावी करत तलवार घेऊन धाऊन आले. यानंतर गावकरी घाबरले व त्यांनी दगडफेक केली असे गावकरी सांगत आहेत.