रिक्षा चालक अन् बस कंडक्टरचा मारहाणीचा VIDEO व्हायरल; दोघेही पोलिसांच्या ताब्यात

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच एका रिक्षा चालकाचा आणि शहर बस कंडक्टरचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रवासी बसवण्याच्या वादावरून रिक्षा चालकाने शहर बस कंडक्टरला मारहाण केली.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच एका रिक्षा चालकाचा आणि शहर बस कंडक्टरचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रवासी बसवण्याच्या वादावरून रिक्षा चालकाने शहर बस कंडक्टरला मारहाण केली. अखेर पोलिसांनी रिक्षा चालकाला आणि बस कंडक्टरला ताब्यात घेतले. रस्त्यावरती काही काळ ट्रॅफिक जाम झाली होती, पोलिसांनी मध्यस्थी करत ट्रॅफिक सुरळीत केली.