पीक कर्ज वाटप करताना हयगय केली तर कडक कारवाई करू : अजित पवारांचा इशारा

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती वाढत आहे. या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे आरोगयमंत्री डॉ. राजेश टोपे जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या बैठकही घेत आहेत. या बैठकांतून खरीप हंगामाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत चर्चाही करीत आहेत. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबाद येथे खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशाराही दिला.

    उस्मानाबाद येथे शुक्रवारी केलेल्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. शेतकऱ्यांना जे पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्या पीक कर्ज वाटपाबाबत अधिकाऱ्यांनी जर काही दुजाभाव केला तर त्यांची हयगय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

    राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती वाढत आहे. या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे आरोगयमंत्री डॉ. राजेश टोपे जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या बैठकही घेत आहेत. या बैठकांतून खरीप हंगामाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत चर्चाही करीत आहेत. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबाद येथे खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशाराही दिला.