3 farmers commit suicide in 2 days in Beed district; Baliraja bored due to heavy rains

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केवळ दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, परळी या तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे( 3 farmers commit suicide in 2 days in Beed district).

    बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केवळ दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, परळी या तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे( 3 farmers commit suicide in 2 days in Beed district).

    बाळासाहेब रामलिंग गित्ते (25) यांनी 19 तारखेला आत्महत्या केली. तर सिद्धेश्वर धर्मराज फरताडे (34) यांनी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी व नागोराव धोंडिबा शिंदे यांनी सायंकाळी उशिरा आत्महत्या केली. अतिवृष्टीने मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी शासनाची मदत पोहोचली नाही.

    केवळ पंचनाम्याचा फार्स आणि आश्वासनांची खैरात या प्रशासन आणि सरकारमधून दिली जात आहे. यामुळे इथला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे जगावे कसे ? या द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांकडून आता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.

    अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे, रब्बीचा हंगाम सुरू होत आहे, यामुळे आता येणारा सणवार कसा करावा? घेतलेले कर्ज कुठून फेडावे? रब्बीसाठी बियाने कुठून आणावे ? वाहून गेलेले शेत पुन्हा कसदार कसे बनवावे ? या एक ना अनेक संकटाने येथील शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.