निजामकालीन शाळांच्या बांधकामासाठी बीड जिल्ह्यास 70 कोटीचा निधी मंजूर

मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या बांधकामासाठी 200 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये सर्वाधिक निधी हा बीड जिल्ह्यास दिला असून बीड जिल्ह्यात निजामकालीन शाळा ह्या सर्वात जास्त बीड जिल्ह्यात आहेत.

    बीड : मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या बांधकामासाठी 200 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये सर्वाधिक निधी हा बीड जिल्ह्यास दिला असून बीड जिल्ह्यात निजामकालीन शाळा ह्या सर्वात जास्त बीड जिल्ह्यात आहेत आणि या सर्वच शाळांच्या बांधकामासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत याची घोषणा केली असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

    तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे त्यांनी आभार देखील मानले ही खूप मोठी उपलब्धी असून लवकरच या सर्व शाळा बांधनिस सुरुवात करणार असल्याचे ही ते म्हणले.