भोजगावच्या अमृता नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाने घेतला एक बळी

बीडच्या भोजगाव येथील अमृता नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाने आणखी एक बळी घेतलाय. पुलावरून सावडण्याच्या कार्यक्रमाला जात असताना पाण्यात पडुन सुदर्शन संत या तरुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

    बीड : बीडच्या भोजगाव येथील अमृता नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाने आणखी एक बळी घेतलाय. पुलावरून सावडण्याच्या कार्यक्रमाला जात असताना पाण्यात पडुन सुदर्शन संत या तरुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

    तर ज्या मयत मुलीच्या सवडण्याच्या कार्यक्रमाला तो जात होता. त्या मयत मुलीचा मृतदेह देखील दोन दिवसांपूर्वी वडिलांना आपल्या खांद्यावर घेऊन जावा लागला होता. तर या नेहमी होणाऱ्या दुर्घटनेमुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर मृतदेह ठेवून रस्ता रोको करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केलाय.

    गेल्या काही वर्षांपासून भोजगावला जोडणारा अमृता नदीवरील पुल वाहुन गेला आहे. याआधी देखील वाहुन जाण्याच्या घटना घडलेल्या असुन आज परत ही घटना घडली आहे..त्यामुळे निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल भोजगाव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे..दरम्यान नागरिकांनी मृतदेह गेवराई – शेगाव राज्य महामार्गावर ठेवून महामार्ग बंद केलेला आहे.