कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने राग अनावर, दोन गटांत तुंबळ हाणामारी…

कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना केज तालुक्यातील विडा येथे घडली असून या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत मारामारी केली आहे.

    बीड : कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना केज तालुक्यातील विडा येथे घडली असून या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत मारामारी केली आहे.

    नेमकं काय घडलं ?

    केज तालुक्यातील विडा येथे एका व्यक्तीने कुत्र्याच्या अंगावरुन गाडी घातली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेले असता कुत्र्याचा मालक तसेच ज्या व्यक्तीने कुत्र्याच्या अंगावरुन गाडी घातली त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. नंतर हा वाद चिघळत गेला. परिणामी या दोन्ही गटामध्ये दगडफेक तसेच तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील चार जण जखमी झाले आहेत.

    एकमेकांवर दगडाचा पाऊस

    कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत होते. महिला तसेच मुलंसुद्धा या भांडणामध्ये सामील होते. महिला, मुलं आणि पुरुषांनी मिळून एकमेकांवर चक्क दगडांचा मारा केला. यामध्ये एकूण चार जण जखमी झाले आहेत.