Another blow to MLA Ratnakar Gutte! A large poultry farm in Parli is in the possession of ED after assets worth Rs 250 crore were seized

गंगाखेड येथील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची मालमत्ता ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता ताब्यात घेतल्या नंतर आता परळी मधल्या योगेश्वरी हॅचरिज ही पोल्ट्री सुद्धा ताब्यात घेतली आहे. यामुळे गुट्टेंच्या अडचणीत वाढ होणार आहे(Another blow to MLA Ratnakar Gutte! A large poultry farm in Parli is in the possession of ED after assets worth Rs 250 crore were seized).

    बीड: गंगाखेड येथील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची मालमत्ता ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता ताब्यात घेतल्या नंतर आता परळी मधल्या योगेश्वरी हॅचरिज ही पोल्ट्री सुद्धा ताब्यात घेतली आहे. यामुळे गुट्टेंच्या अडचणीत वाढ होणार आहे(Another blow to MLA Ratnakar Gutte! A large poultry farm in Parli is in the possession of ED after assets worth Rs 250 crore were seized).

    परळी-अंबाजोगाई रोडवर ही भली मोठी पोल्ट्री आहे. जी आता ईडी ने ताब्यात घेतली आहे. या पूर्वी गंगाखेड शुगर फॅक्टरीची 100 एकर जमीन ताब्यात घेतल्या नंतर आता पोल्ट्री ईडीच्या ताब्यात गेली आहे.

    आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मुलाला राज्यातील मोठ्या GST घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा तब्बल ५२० कोटी रुपयांच्या असून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी ही अटक करण्यात आली याची चौकशी सुरु आहे.

    या शिवाय रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Ltd) हा साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या गंगाखेड शुगर कंपनीची परभणी, बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

    ईडीने गंगाखेड शुगर अँड एनर्जी, योगेश्वरी हॅचरीज (Yogeshwari Hetcheries) आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. या तीनही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग कायद्या (Money Laundering Act) अंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावे उचलल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पावर लिमिटेड इतर कंपन्यांमध्ये लावली ज्यांच्यावर आता ईडीने कारवाई केलीय.

    काय आहे प्रकरणाची पार्श्वभूमी

    २०१७ साली परभणी च्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ६ बँकाकडून तब्बल ३२८ कोटींचे कर्ज उचलले होते. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने व बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर ऊस पुरवला. त्या परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्र तयार करून पाच राष्ट्रीयकृत बँका ज्यात आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक तर मुंबईची रत्नाकर बँक याच्याकडून तब्बल ३२८ कोटींची रक्कम परस्पर उचलली. जेंव्हा याबाबत शेतकऱ्यांना बँकांनी नोटीसा पाठवल्या तेंव्हा हे प्रकरण उजेडात आले होते.

    हे सुद्धा वाचा
    • 2022