सरकारच्या बंदीला जुगारून सत्ताधारी आणि विरोधकांनी थाटली बैलगाडी शर्यत

बीड मध्ये सरकारच्या बंदीला जुगारून बीड तालुक्यातील इमामपूर गावात भव्यदिव्य बैलगाडी शर्यत घेण्यात आली आहे या बैलगाडी शर्यत मध्ये 25 पेक्षा जास्त बैलगाड्यानी सहभाग घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यत सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघन ,पदाधिकारी परमेश्वर सातपुते शिवसेना जिल्हाप्रमुखचे बंधू गणेश खांडे या सत्ताधारी मंडळींनी या बैलगाडी शर्यतीचे उदघाटन केले तर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी या बैलगाडी शर्यत मध्ये जाऊन प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिले.

    बीड : अनेक वर्षांपासून बैलगाडी शर्यतीला राज्यात बंदी आहे मात्र बीड मध्ये सरकारच्या बंदीला जुगारून बीड तालुक्यातील इमामपूर गावात भव्यदिव्य बैलगाडी शर्यत घेण्यात आली आहे या बैलगाडी शर्यत मध्ये 25 पेक्षा जास्त बैलगाड्यानी सहभाग घेतल्याची चर्चा आहे.
    दरम्यान या शर्यत मध्ये गाडी ओढणाऱ्या बैलाला काट्यांनी अमानुष मारहाण करीत गाड्या डांबरी रस्त्यावर पळविल्या  विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यत सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघन ,पदाधिकारी परमेश्वर सातपुते शिवसेना जिल्हाप्रमुखचे बंधू गणेश खांडे या सत्ताधारी मंडळींनी या बैलगाडी शर्यतीचे उदघाटन केले तर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी या बैलगाडी शर्यत मध्ये जाऊन प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिले. त्यामुळे राज्य सरकारचे कायदे आणि नियवाली फक्त सर्वसामान्य लागू होते का असा प्रश्न उपस्थिती केला गेला आहे.
    त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना राज्य सरकारचे कायदे काय आहेत हे कारवाई करून सांगतील अशी अपेक्षा, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा विश्वास बसेल कायदा सर्वाना सम्मान आहे.