Beed district will not be discredited; Dhananjay Munde targets Pankaja Munde

बीड जिल्ह्यात माफिया राज बोकाळला असल्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे आहे असा सवाल करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुडेंवर निशाणा साधला होता. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे(Beed district will not be discredited; Dhananjay Munde targets Pankaja Munde).

  बीड : बीड जिल्ह्यात माफिया राज बोकाळला असल्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे आहे असा सवाल करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुडेंवर निशाणा साधला होता. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे(Beed district will not be discredited; Dhananjay Munde targets Pankaja Munde).

  बीडमध्ये अनागोंदी प्रकार समोर

  अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर देण्याची मागणी केली आहे. धमक्या देऊन आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून बिलांवर सह्या करण्यात येत असल्याचा अनागोंदी प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. यामुळे या अभियंत्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रिव्हॉल्वरची मागणी केली आहे. या मागणीमुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद सुरु झाला आहे.

  पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

  ज्याला त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. व्यक्त होणं संदर्भातील अधिकार आहेत . ते संविधानाने दिलेले आहेत. अशा पद्धतीची घटना समोर आल्यानंतर आणि माध्यमांनी ब्रेकिंग केल्या नंतर सत्ता पक्षाच्या विरोधात एखादी संधी मिळाली तर ती संधी घेऊन त्या ठिकाणी आपलं मत बोलले जाते. पण जिल्ह्याची बदनामी होते, अशावेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आपण ज्या भूमीत जन्मला आलो त्या भूमीच्या बाबतीत काय लिहावं काय बोलावं या बाबतीत विचार केला पाहिजे .

  पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात

  अभियंत्याने रिव्हॉल्वरची मागणी केल्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला आहे. बीडमध्ये एखाद्या कार्यकारी अभियंत्याला अशी मागणी करण्याची वेळ येणं दुर्दैवी आहे. सत्ताधारी नेत्यांचे नियंत्रण जिल्ह्यावर राहिले नाही. मागील काही महिन्यांपासून वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय आणि खोट्या केस दाखल करणे, संस्थांवर दबाव टाकून प्रशासक आणण्याचे प्रकार सत्ता असल्यामुळे सर्रास सुरु असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे

  बीड जिल्ह्याला बदनाम करू नये

  माध्यमांना विनंती आहे बीड जिल्ह्याला बदनाम करू नये. जो अधिकारी बीड जिल्ह्यात कार्यरत होऊन पंधरा दिवस देखील झालेले नाहीत, त्या अधिकाऱ्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटते. त्याने अजून कुठल्या बिलावर देखील सही केलेली नाही. पंधरा दिवसापूर्वी जॉईन झाला आणि पंधरा दिवसात कलेक्टर ला देखील पत्र लिहिले. बीड जिल्ह्याची बदनामी आहे, ही बदनामी बीड जिल्ह्याची सहन केली जाणार नाही. तसेच जर कोणी अधिकाऱ्याला असे काही करत असेल तर ते देखील खपवून घेतला जाणार नाही. अधिकाराच्या मागे सरकार म्हणून आम्ही ताकदीने उभे राहा, सामान्य नागरिक उभे राहतील. चांगल्या कामासाठी अधिकाऱ्यांनी काम करणेदेखील गरजेचे आहे

  अधिकाऱ्यांवर दबाव आणला तर गय नाही

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकारी अभियंता संजय कोकणेंच्या मागणीची दखल घेतली आहे. कोकणे यांना पोलिसांचा तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे. जर जिल्ह्यात अशा पद्धतीने कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असले तर त्याची गय करणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022