Big scam in Beed: 409 acres of Waqf board land seized; Filed charges against 15 persons including 8 revenue officers and employees

जिल्ह्यात वक्फ आणि देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बनावट कागदपत्रांधारे हडप केल्याची प्रकरणे समोर येत असून आष्टी तालुक्यात या प्रकरणी तीन गुन्हेही दाखल झाली आहेत. आता शेहेंनशवाली दर्गाची 409 एकर जमीन हडपल्याप्रकरणी भूमाफिया आणि महसुलात बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणातही तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा समावेश समोर आला आहे. 3 मार्च 2018 ते 29 डिसेंबर 2021 या दरम्यान हा सारा फसवणूकीचा प्रकार घडला(Big scam in Beed: 409 acres of Waqf board land seized; Filed charges against 15 persons including 8 revenue officers and employees).

    बीड : जिल्ह्यात वक्फ आणि देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बनावट कागदपत्रांधारे हडप केल्याची प्रकरणे समोर येत असून आष्टी तालुक्यात या प्रकरणी तीन गुन्हेही दाखल झाली आहेत. आता शेहेंनशवाली दर्गाची 409 एकर जमीन हडपल्याप्रकरणी भूमाफिया आणि महसुलात बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणातही तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा समावेश समोर आला आहे. 3 मार्च 2018 ते 29 डिसेंबर 2021 या दरम्यान हा सारा फसवणूकीचा प्रकार घडला(Big scam in Beed: 409 acres of Waqf board land seized; Filed charges against 15 persons including 8 revenue officers and employees).

    जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. वक्फ बोर्डाची जिल्ह्यात 796 एकर जमीन आहे, त्यापैकी 409 एकर 5 गुंठे जमीन सेवा बनावट कागदपत्रे तयार करुन खासगी लोकांच्या नावे करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दर्गा हजरत शहशाहवली दर्गाची सेवा इनाम जमीन सर्वे नं.22 व 95 मधील काही जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र.211 साठी शासनाने संपादित केलेली आहे.

    महामार्गाच्या चौपदरीकरणात या जमिनीचा सुमारे 15 कोटी रुपये नुकसान भरपाई आली होती. तो हडपण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शासनाची वक्फ बोर्डाची फसवणूक करण्यात आली. तसेच तत्कालीन भूसुधार उपजिल्हाधिकारी प्रकाश अघाव यानीही हबीबोद्दीन यांच्याशी संगनमत केले, असा आरोप करण्यात आला आहे.