परळीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या मतदानात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या प्रकरणावरुन पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.  गेल्या पाच वर्षात बीडमध्ये गुण्या गोविंदाने निवडणुका झाल्या होत्या. ही पद्धत कायम ठेवावी लागेल याचे भान सर्वांनी ठेवायला हवे, अशी प्रतिक्रीया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

    बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या मतदानात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या प्रकरणावरुन पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.  गेल्या पाच वर्षात बीडमध्ये गुण्या गोविंदाने निवडणुका झाल्या होत्या. ही पद्धत कायम ठेवावी लागेल याचे भान सर्वांनी ठेवायला हवे, अशी प्रतिक्रीया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

    दरम्यान मतदानाची वेळ ही दुपारी ४ वाजेपर्यंत होती. मात्र वेळ संपल्यानंतरही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी घेऊन आले होते, असा आरोप भाजपने केला आहे . याच पार्श्वभूमीवर परळीमधील औद्योगिक वसाहत कार्यालयातील मतदान केंद्रासमोर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते .

    साधारण निवडुका झाल्या असत्या तर आज आमचा विजय नक्की होता, म्हणून विरोधकांनी मागच्या दाराने अशाप्रकारचा गोंधळ घालून या निवडणूकीला अशाप्रकारचा रंग दिला, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. दरम्यान या निवडणुकीत ५१ टक्के मतदान झाले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

    मतदानाची वेळ दुपारी चार वाजेपर्यंत होती. मात्र चार वाजल्यानंतरही मतदारांना मतदान करायला सांगितले जात होते. मतदानाची वेळ संपली आहे आता मतदान झाले नाही पाहिजे, अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.