सरकार कोसळेल म्हणून भाजपाने देव पाण्यात बुडवून ठेवलेत पण तेच पाण्यात बुडणार : मंत्री विजय वडेट्टीवार

सरकार कोसळेल म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवलेत आता तेच पाण्यात बुडतील म्हणत असं विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या टी सी राव याना प्रत्युत्तर दिले.

    बीड : मंत्री विजय वडेट्टीवार बीड च्या दौऱ्यावर होते. बीड मध्ये आयोजित ओबीसीच्या मेळाव्याला ते संबोधन करत असतांना म्हणले की, सरकार कोसळेल म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवलेत आता तेच पाण्यात बुडतील म्हणत असं विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या टी सी राव याना प्रत्युत्तर दिले.

    दरम्यान ते पुढे बोलतांना म्हणले की, भाजप नेते म्हणजे ज्योतिष्यासारखे वक्तव्य करतात मात्र जोत्यीष्य कधीच खर होत नाही, तसेच त्यांचं वक्तव्य हवामान खात्यासारखे आहे जे कधीच सत्य होत नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले.

    महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल असं वक्तव्य भाजपचे मंत्री सी टी राव यांनी केलं होतं, याला प्रतिउत्तर देत विजय वडेट्टीवार चांगलेच बरसले.