Another blow to MLA Ratnakar Gutte! A large poultry farm in Parli is in the possession of ED after assets worth Rs 250 crore were seized

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका दिला. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने तत्काळ कारवाई करीत गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळ्यातील जवळपास 255 कोटींची मालमत्ता जप्त केली(Borrowed money in the name of poor farmers and invested the money in their companies; MLA Ratnakar Gutte's assets worth Rs 255 crore confiscated by ED).

  बीड : राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका दिला. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने तत्काळ कारवाई करीत गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळ्यातील जवळपास 255 कोटींची मालमत्ता जप्त केली(Borrowed money in the name of poor farmers and invested the money in their companies; MLA Ratnakar Gutte’s assets worth Rs 255 crore confiscated by ED).

  ईडीने जीएसईएलशिवाय योगेश्वरी हॅचरिज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेड विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. या तिन्ही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

  शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन आपल्या कंपन्यांत गुंतवले

  मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या विरोधात गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कृषी कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे. गुट्टे यांनी इतर काही जणांसोबत मिळून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून गंगाखेड शुगर या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल 635 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकांकडून घेतलेली कर्जे 2012-13 आणि 2016-17 दरम्यानची होती. ही कर्जे वितरीत झाल्यानंतर गंगाखेड शुगरद्वारे इतर विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज काढले होते, त्यांना कधीच ते कर्ज मिळाले नाहीत.

  635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक

  635 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप स्पष्ट झाल्यानंतर ईडीने कारवाई केली आहे. ज्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते, त्या कंपन्यांची सुमारे 255 कोटींची मालमत्ता जप्त केली. गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची 247 कोटी रुपये किंमतीची यंत्रे आणि पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरिज, गंगाखेड सोलर पॉवरच्या परभणी, बीड आणि धुळ्यातील बँकांमधील सुमारे दीड कोटींची गुंतवणूक, तसेच गंगाखेड शुगर्सचे 1 कोटीहून अधिक रुपयांचे समभाग, यांचा जप्त मालमत्तेत समावेश आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022