मांजरा धरण ओव्हरफ्लो; तब्बल सहा दरवाजे उघडले

मांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर येऊ शकतो. त्यामुळं काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर मांजरा धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

    बीड : बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली.

    त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे 25 इंच ने उघडण्यात आले असून 149.80 क्यूसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान मांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर येऊ शकतो. त्यामुळं काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर मांजरा धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून पाण्याचा प्रश्न मिटला आहे.