पत्नीसह 2 वर्षीय चिमुकलीची निर्दयीपणे हत्या करत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आलीय.

    बीड : पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आलीय. गावात मोहा रोड परिसरात रात्री साडेनऊ ते 10 च्या दरम्यान ही घटना घडलीय. तर घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

    गावातील अल्लाबकश शेख याने आपली पत्नी व 2 वर्षीय मुलची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून आलाय. तर या घटनेला अंजाम देऊन त्याने स्वतःहा देखील गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दरम्यान अल्लाबकश याने असं का केलं ? याचा तपास पोलीस करत आहेत असून तिन्ही मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर अहवाल आल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिली तर, गुन्हा दाखल होईल. अशी माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान या दुर्दैवी व क्रूर घटनेने सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.