
बीड : विलनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यावंर निलंबनाची कारवाई केली जात आहे. कारवाईच्या भितीने बीड आणि जळगावात ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे (Fear of suspension action; Attempted suicide of ST employees in Beed and Jalgaon) .
बीडमधील परळी आगारात एका एसटी चालकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागनाथ गित्ते असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे. परळी आगाराचे एस.टी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. बुधवारी पहिल्यांदाच गित्ते हा चालक आणी वाहक मोहन गित्ते हे कामावर हजर झाल्याने एसटीच्या अधिकारी व पोलिस संरक्षणात परळी बीड बस सोडण्यात आली होती. मात्र काल एक फेरी मारल्यानंतर गित्ते यांनी विष घेतले. त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
रावेर आगारातील ३३१ कर्मचारी गेल्या ७ नोव्हेबर पासुन बेमुदत संपावर आहे. आता पर्यंत २५ कर्मचारी यांचे निलंबन तर ६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आल्याने कर्मचारी भयभीत झालेले आहेत. निलंबनाच्या आदेशाने चालक राहुल विश्वनाथ कोळी यांना गेल्या ८ दिवसांपुर्वी निलंबनाचे आदेश जे पी. जंजाळ डेपो व्यवस्थापक यांनी दिले होते. त्याचा धसका घेवुन त्यांनी डेपो मध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. डेपोमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्याला वेळीच ग्रामीण रुग्णालयात एस.टी. ने घेवुन गेले त्यांचेवर प्राथमिक उपचार करून जळगाव येथे पाठवित आले आहे.