राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा पुर परिस्थीती निर्माण; अनेक गावांचा संपर्क तुटला

काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेला आहे. नदीला पुर आल्याने तालुक्यातील चिंचोटी, हरीश्चंद्र पिंप्री चिंचवडगाव काडीवडगाव अदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर सिंदफना नदीला मिळणाऱ्या छोट्या नदी नाले ओढ्यांना पूर आल्याने शेती कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना शेतातच मुक्काम करावा लागला. तर तिकडे माजलगाव तालुक्यामध्ये लेंडी, सरस्वती, कुंडलिका नदीला पूर आला आहे. या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

    बीड : काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेला आहे. बीड शहराच्या मुख्य मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणीही पाणीच पाणी असल्याचं चित्र होतं. मध्यरात्री जोरदार पावसानंतर बसस्थानकामध्ये गुडघाभर पाणी होतं. मध्यरात्री सुरू झालेल्या पावसामुळे बीड शहरामध्ये मुख्य ठिकाण पाण्याने वेढलेली होती. तर रात्रीपासून व पहाटे पर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे वडवणी तालुक्यातील पुसरा नदीला प्रचंड पूर आल्याने पुसरा पुलावरून पाणी वाहत आहे.

    दरम्यान या वर्षी पुसरा नदी तीन वेळेस दुथडी भरून वाहिली आहे. नदीला पूर असल्याने पुसरा, तिगाव, चिंचाळा गावांचा संपर्क तुटला असुन दळणवळण चा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर तालुक्यात गेली तिन दिवस झाले पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिक वाहुन गेले आहेत.

    तर नदीला पुर आल्याने तालुक्यातील चिंचोटी, हरीश्चंद्र पिंप्री चिंचवडगाव काडीवडगाव अदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर सिंदफना नदीला मिळणाऱ्या छोट्या नदी नाले ओढ्यांना पूर आल्याने शेती कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना शेतातच मुक्काम करावा लागला. तर तिकडे माजलगाव तालुक्यामध्ये लेंडी, सरस्वती, कुंडलिका नदीला पूर आला आहे. या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

    दरम्यान अतिवृष्टीमुळे पूर्ण बीड जिल्ह्यात नुकसान झाले आहे. केज,अंबाजोगाई, बीड माजलगाव वडवणी तालुक्यात सध्याची भयंकर पूर परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणीही होत आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.