Government's decision prohibits ST employees from preparing meals in the depot

दीड महिन्यांपासून आगारात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था आगारातच केली होती. परंतु, शासनाने आज या ठिकाणी कर्मचाऱ्यास जेवण बनविण्यास मज्जाव केला आहे.

    बीड : एसटी कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मुद्यांवर संपावर आहेत. विलीनीकरणाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने आता बराच पल्ला गाठला आहे. या आंदोलनास आता ७४ दिवस पूर्ण झाले आहे. तरीही कर्मचारी आणि शासन आपल्या मुद्यांवर ठाम आहे. तरी, बीड आगारातून काही अंशी बसेस सुरु झाल्या आहेत. तर, काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे.     

    आधीच विलीनीकरणाच्या मुद्यांवर ठाम असलेले कर्मचारी पुन्हा एकदा शासनाच्या निर्णयावर नाराज झाले आहे. बीड जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचारी आपली एकजूट दाखवण्यासाठी, मध्यवर्ती बीड आगारात येत असत. दीड महिन्यांपासून आगारात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था आगारातच केली होती. परंतु, शासनाने आज या ठिकाणी कर्मचाऱ्यास जेवण बनविण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे, आधीच संतापलेले कर्मचारी अजूनच आक्रमक झाले आहेत. तर, विविध सामाजिक संघटनेकडून या कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली जात होती. मात्र, आता सरकराने कर्मचाऱ्यांच्या तोंडातला हा सुद्धा घास हिरावून घेतल्याने कर्मचाऱ्यांनी अधिकच नाराजी व्यक्त केली आहे.