Sapna Chaudhari In Maharashtra

परळी मध्ये प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीने(Haryani dancer Sapna Chowdhury ) ठुमके लगावलेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(Social Justice Minister Dhananjay Munde) यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

    बीड : परळी मध्ये प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीने(Haryani dancer Sapna Chowdhury ) ठुमके लगावलेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(Social Justice Minister Dhananjay Munde) यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

    एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? हा प्रश्न उपस्थित झालाय. या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका होते आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

    सामाजिक न्याय विभागाचं भान न्याय मंत्र्यांनी राखला पाहिजे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजही अतिवृष्टीगची मदत मिळाली नाही. त्याचा आढावा पालकमंत्र्यांनी घ्यावा, धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना त्यांना सामाजिक भान होतं. मात्र आता त्यांचे सामाजिक भान हरवले असल्याची टीका मेटेंनी केली.