सरपण घेऊन शेतातून घरी येत असताना वाटेतच मृत्यूने गाठले; नवरा-बायकोचा जागेवरच मृत्यू

सरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती-पत्नीचा विद्युत वायरला चिटकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील जरुड गावात घडली. वैजिनाथ शामराव बरडे (30) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे (30) अशी मृतांची नावे आहेत.

    बीड : सरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती-पत्नीचा विद्युत वायरला चिटकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील जरुड गावात घडली. वैजिनाथ शामराव बरडे (30) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे (30) अशी मृतांची नावे आहेत.

    या दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व वीज चोरून वापरणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    या घटनेने बरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वीजेचा करंट लागून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण गेल्या अनेक दिवसात वाढले आहे.