‘मैंने घोटाले निकाले, उन्हे मिरची लगी तो मै क्या करू’ किरीट सोमय्यांचा कवी मोड ऑन

‘मी हसन मुश्रीफांचा घोटाळा काढला मला कोल्हापुरला अंबेमातेच्या दर्शनाला जाऊ दिलं नाही. वाशिमच्या खासदार भावना गवळींचा घोटाळा बाहेर काढला तिथं गेल्यावर दगडफेक केली. जीवे मारण्याची प्रयत्न भवना गवळी आणि उध्दव ठाकरेच्या शिवसेनेच्या गुंडांनी केला. अमरावतीला हिंदुंची दुकानं जाळली गेली तर तिथं प्रतिबंध केला.’ ‘मी पिंपरी-चिंचवडला गेलो तर काळे झेंडे.. किरीट सोमय्या चले जावच्या घोषणा दिल्या. त्या अर्जुन खोतकरचा 100 कोटींचा घोचाळा काढला तर किरीट सोमय्या मुर्दाबाद आणि इथंच मिर्ची लागते. भाई मैने इनके घोटाले निकाले तो इनको मिरची लगी तो मै क्या करू?’ असं म्हणत किरीट सोमय्यांनी राज्य सरकारची खिल्ली उडवली.

    भाजप नेते किरीट सोमय्या हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी अंबाजोगाई येथे भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अंबाजोगाईतील एका नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्या दरम्यान सोमय्या यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मैंने घोटाले निकाले, उन्हे मिरची लगी तो मै क्या करू’ असं म्हणत सोमय्या यांनी राज्य सरकारची खिल्ली उडवली.

    यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘मी हसन मुश्रीफांचा घोटाळा काढला मला कोल्हापुरला अंबेमातेच्या दर्शनाला जाऊ दिलं नाही. वाशिमच्या खासदार भावना गवळींचा घोटाळा बाहेर काढला तिथं गेल्यावर दगडफेक केली. जीवे मारण्याची प्रयत्न भवना गवळी आणि उध्दव ठाकरेच्या शिवसेनेच्या गुंडांनी केला. अमरावतीला हिंदुंची दुकानं जाळली गेली तर तिथं प्रतिबंध केला.’

    ‘मी पिंपरी-चिंचवडला गेलो तर काळे झेंडे.. किरीट सोमय्या चले जावच्या घोषणा दिल्या. त्या अर्जुन खोतकरचा 100 कोटींचा घोचाळा काढला तर किरीट सोमय्या मुर्दाबाद आणि इथंच मिर्ची लागते. भाई मैने इनके घोटाले निकाले तो इनको मिरची लगी तो मै क्या करू?’ असं म्हणत किरीट सोमय्यांनी राज्य सरकारची खिल्ली उडवली.

    मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तीक टीका

    याच सभेत बोलताना सोमय्यांच बोलण्यावरचा कंट्रोल गेला आणि त्यांनी धनंजय मुंडेवर वैयक्तीक टीका केली. सोमय्या म्हणाले, “मागच्या वेळी मी जेव्हा धनंजय मुंडेंचा दुसरा घोटाळा काढला, दुसरा नाही पहिला घोटळा.. पहिली बायको दुसरी बायको तिसरी बायको, तिसरीची इतकी मुलं आणि दुसरिची किती अजूनपर्यंत टोटलच लागलेली नाही.”  असं म्हणत किरीट सोमय्यांनी मुंडे यांच्यावर वैयक्तीक टीका केली.