बीड जिल्ह्यात उपोषणाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी केली बस बंदची हाक

28 टक्के महागाई भत्ता आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनिकरण करण्यात यावे. यासाठी बीडमध्ये कालपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आज सकाळपासूनच शंभर टक्के कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत एकप्रकारे बस बंदची हाक देण्यात आली आहे.

    बीड : 28 टक्के महागाई भत्ता आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनिकरण करण्यात यावे. यासाठी बीडमध्ये कालपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आज सकाळपासूनच शंभर टक्के कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत एकप्रकारे बस बंदची हाक देण्यात आली आहे.

    सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच आगारातून बस बंदची हाक दिल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ज्या गाड्या परजिल्ह्यातून आलेल्या आहेत. त्याचे गाड्या या ठिकाणाहून रवाना होताना पाहायला मिळत आहेत. मात्र, स्थानिक आगारातील एकाही बसची फेरी अद्याप झालेली नाही.

    दरम्यान जोपर्यंत कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळत नाही. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत उपोषण आणि आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.