भर चौकात भाजी विक्रेता महिलेला शरीर सुखाची मागणी करत केली अमानुष मारहाण

भाजी विक्री करणाऱ्या महिलेला शरीर सुखाची मागणी केल्यानंतर, त्याला विरोध करणाऱ्या पीडितेला एका भर चौकात, तरुणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केलीय. ही धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली. या मारहानीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    बीड : भाजी विक्री करणाऱ्या महिलेला शरीर सुखाची मागणी केल्यानंतर, त्याला विरोध करणाऱ्या पीडितेला एका भर चौकात, तरुणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केलीय. ही धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली. या मारहानीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात तक्रार गुन्हा दाखल होऊनही पोलीस कारवाई करत नाहीत, म्हणून मला न्याय नाही मिळाला. तर आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे. बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून कायदा सुव्यवस्था आहे का ? असा प्रश्न निर्माण होत असून पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    बीड शहरातील मित्र नगर चौकात भाजीपाला विकून विक्री करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या पीडित महिलेला, आरोपी सिताराम बडे याने “तुझ्या पतीला पैसे दिले आहेत, तो पैसे परत करत नाही, तू पैसे देत नाही, तू माझ्यासोबत चल” असे म्हणत शारीरिक सुखाची मागणी केली आहे. याला विरोध केला असता आरोपी सिताराम बडे याने, पीडितेला मारायला सुरुवात केली. अंगावरील कपडे पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भर चौकात घडलेल्या घटनेत मात्र पोलिसांनी या प्रकरणात थातुरमातुर कारवाई केल्याचा आरोप पीडित महिलेने केली आहे. ही घटना दि 11 सप्टेंबर रोजीची आहे, मात्र मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झालेत.

    इतक्या गंभीर प्रकरणात पोलिस आरोपींना पाठीशी घालत आहेत.याबाबत संताप व्यक्त केला जात असून या गंभीर प्रकरणात शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना फोनवरून संपर्क केला असता, त्यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल असून आरोपीवर कारवाई केली आहे. असं सांगितलं मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळं याप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून पीडितेला न्याय द्या अशी मागणी होत आहे. न्याय नाही मिळाला तर आत्मदहनाचा इशारा पीडित महिलेने दिला आहे यासंदर्भात थेट जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून पीडितेने इशारा दिला आहे.