अतिवृष्टीच्या संकटात आम्ही खंबीरपणे पाठीमागे, मदत आली पण पदरात पडूस्तर काय? : डॉ. प्रितम मुंडे

प्रीतम मुंडे म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा मिळत नाही कुठलेही अनुदान मिळत नाही. अतिवृष्टीचे संकट आल असताना आम्ही भगिनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम केलं . सरकार दरबारी संघर्ष करताना मोर्चे काढले, धरणे धरले पण सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी पदरात पडेपर्यंत काय खरं? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केलाय.

    बीड : बीड जिल्ह्यात पंकजाताईची सत्ता असताना त्यांनी मंजूर केलेल्या विकास कामाचे उद्घाटन आजही आम्ही करतो, एवढेच काय आजचे सत्ताधारी त्याच काळात मंजूर झालेल्या विकास कामाचे खऱ्या अर्थाने उद्घाटन करत फिरत असल्याची खरमरीत टीका जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी केली.

    प्रीतम मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

    विकास काम तथा जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या मनात नियत चांगली असली पाहिजे . जिल्ह्यातील जनतेवर कोणतेही संकट आले कि आम्ही धावून येतो सरकारने आतिवृष्टीची तुटपुंजी मदत जाहिर केली पण पदरात पडूस्तर काय खरे? हे सांगतांना आमच्या सत्ता काळात लोकांना भरिव पैसे मिळत होते हि आठवण त्यांनी करून दिली. लव्हरी ता . केज येथील विकास कामाचे लोकार्पन करतांना त्या बोलत होत्या.

    या वेळी आ सौ नमिताताई मुंदडा अक्षय मुंदडा, राम कुलकर्णी विजयकांत , सौ उषाताई मुंडे डॉ . शालिनी , रमाकांत मुंडे भगवान , डॉ . वासुदेव नेहरकर विष्णुपंत , दत्ता धस शेषेराव कसबे आदी मान्यवरांची उपस्थीती होती .

    या सर्कलचे विद्यमान जिप सदस्य विजयकांत मुंडे यांनी एकाच दिवशी सात विकास कामाचा झंझावात ठेवला . या गावात केज कानडी लव्हरी या प्रमुख रस्त्यावर 5 कि.मी. डांबरी करण झाले आणि पशुवैधकिय दवाखाना इमारत लोर्कापन सोहळा पार पडला . खासदार आमदाराचे गावात जोरदार स्वागत झाल्या नंतर उपस्थीत गावकरांच्या समोर त्यांनी संवाद साधला.

    मदत जाहीर केली असली तरी पदरात पडेपर्यंत काय खरं?

    प्रीतम मुंडे म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा मिळत नाही कुठलेही अनुदान मिळत नाही. अतिवृष्टीचे संकट आल असताना आम्ही भगिनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम केलं . सरकार दरबारी संघर्ष करताना मोर्चे काढले, धरणे धरले पण सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी पदरात पडेपर्यंत काय खरं? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केलाय. सरकारने खरे तर 50 हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना द्यायला हवेत असं त्या म्हणाल्या.

    बीड जिल्ह्यात काम करत असताना आम्ही केवळ विकासाच राजकारण करतो, लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याच्या भूमिकेत आम्ही असतो हे सांगताना त्यांनी करोना सारख्या संकटाचा सामना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्षम पणे केला म्हणुन संकटा पासून आपली सुटका होत आहे . तरी पण ज्यांनी लस घेतलेली नाही अशा लोकांनी लसी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले . आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वःता केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लस्सी उपलब्धच झाल्याचं त्यांनी सांगितलं. कानडी लव्हरी हा रस्ता पाच किलोमीटर असला तरी दर्जेदार झाल्याचं समाधान त्यांनी बोलून दाखवल. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .