धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या करुणा मुंडेंनी काढला स्वत:चा नवा राजकीय पक्ष; थेट परळीतून निवडणूक लढवणार

करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे(Karuna Munde, who accused Dhananjay Munde of rape, formed a new political party; Will contest elections directly from Parli ).

    बीड : करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे(Karuna Munde, who accused Dhananjay Munde of rape, formed a new political party; Will contest elections directly from Parli ).

    तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच भ्रष्टाचारमुक्त आणि समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

    महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात. घोटाळ्यामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक-एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा आहे. त्यासाठी माझा पक्ष काम करेल असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केला.

    30 रोजी अहमदनगरमध्ये मेळावा

    भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे 25 वर्ष पाहिलेले आहे. त्यामुळे आता हे संपवायचे असल्याचे त्या म्हणाल्या. 30 जानेवारी रोजी अहमदनगर मध्ये एक मेळावा होणार असून त्यात पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून याआधी करूणा मुंडे/शर्मा यांना अटक झाली होती. त्यानंतर त्या जामिनावर सुटल्या होत्या.