करुणा शर्मा यांना परळी पोलिस आज न्यायालयात हजर करणार, सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

परळी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखा घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी देखील जमावा विरोधात तक्रार दिली आहे. करुणा यांच्या या तक्रारीनुसार पोलिसांनी जमावावर गुन्हा दाखल केला आहे.

    करुणा शर्मा या परळीत दाखल होताच परळी शहर पोलिसांनी त्यांना अकट केली. यावेळी करुणा यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली म्हणून त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच त्यांच्या गाडीत गावठी पिस्तुल सापडल्याने त्यांच्यावर कलम 307 अंतर्गत कारवाई करण्यात आली. याच प्रकरणात करुणा शर्मा यांना परळी पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत.

    परळी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखा घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी देखील जमावा विरोधात तक्रार दिली आहे. करुणा यांच्या या तक्रारीनुसार पोलिसांनी जमावावर गुन्हा दाखल केला आहे.

    या सर्व प्रकरणाबाबत पोलिस अधीक्षक आर राजा म्हणाले की, “करुणा शर्मा यांच्या एम एच 04 एच एन 3902 गाडीत पिस्तुल कुणी ठेवलं याची चौकशी आम्ही करत आहोत. करुणा यांना मंदिराकडे जाऊ नका असं आम्ही आधीच सांगीतलं होतं. पण तरीसुध्दा त्या गेल्या. त्यामुळे करुणा शर्मा व जमावावर कोरोना निर्बंधासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.”

    धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी कलम 149 अन्वये नोटीस दिली होती. धनंजय मुंडे यांच्या घरासमोर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही विधान करू नये. असं या नोटिशीत म्हटलं होतं. पण करुणा शर्मा यांनी त्याचं उल्लंघन केलं.

    दरम्यान, आता करुणा शर्मा यांना परळी शहर पोलीस अंबाजोगाई न्यायालयात घेवून जात आहेत. त्यामुळे न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.