कोविड नियमांना गेवराईत हरताळ; शहरातील रस्त्यांवर गर्दी प्रशासनाकडून बघ्याची भूमिका

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला त्यांच्याच प्रशासनाकडून हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. याच विषयी नगर परिषद कार्यालयात विचारणा केली असता कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तर, तहसीलदारांनी रहदारीस अडथळा तसेच गर्दी होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येतील असे सांगितले.

    बीड : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. तर, बीड जिल्ह्यातही दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवार रोजी बीडच्या गेवराई येथील आठवडी बाजार असतो. मात्र, कोरोना नियमांचे पालन व्हावे यासाठी फिरुन वस्तु विक्री करण्याचे आदेश मंगळवारी तहसीलदारांनी काढले आहेत. परंतु गेवराई शहरातील रस्त्यांवर विक्रेत्यांनी व ग्राहकांनी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले या परिस्थितीकडे मात्र महसुल, पोलीस व नगरपालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतलीये.

    यासंदर्भात बोलताना तहसीलदार सचिन खाडे म्हणाले की, ‘मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येतेय. ही कोंडी टाळण्यासाठी प्रशाससनाने कालच उपाय योजना केल्या होत्या. गेवराईतील विवीध सहा ठिकाणी बाजार भरवण्याचं आम्ही नियोजन केलं होतं. जेणेकरुन गर्दी विभागली जाईल. या दृष्टीने पोलिस प्रशासन, महानगर परिषद यांना संबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत.’