
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यात येणाऱ्या लक्ष्मी अर्थात केरसुणीचे दर यंदा 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना काळात या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर संक्रात आली होती. आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला असला तरी कारागीर मात्र अडचणीत सापडले आहेत.
बीड : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यात येणाऱ्या लक्ष्मी अर्थात केरसुणीचे दर यंदा 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना काळात या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर संक्रात आली होती. आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला असला तरी कारागीर मात्र अडचणीत सापडले आहेत.
केरसुणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आणि इतर साहित्याच्या दरात वाढ झालीय. यातून केरसुण्याही महागल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या लक्ष्मीपूजनात महागलेल्या लक्ष्मीची पूजा करावी लागणार आहे. घरातील दुकानातील लक्ष्मी म्हणून केरसुनीच्या पूजनाची प्रथा आजही कायम आहे. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन केरसुणीची खरेदी करून तिची विधिवत पूजा करण्यात येते. माञ केरसुणीची दर 10 ते 15 टक्क्यांनी वधारल्याने त्याचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर कारागिरांना देखील बसला आहे.