
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत मजबूत स्थितीत आहे. राज्याचे पूर्वी मुख्यमंत्री व मंत्री राहिलेले अनुभवी या सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे विरोधकांचे सर्व डाव परतवून लावण्याची ताकत महाविकास आघाडी मध्ये आहे. विरोधकांना सर्व प्रकारे तोंड द्यायला आम्ही सक्षम आहोत, असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
बीड : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत मजबूत स्थितीत आहे. राज्याचे पूर्वी मुख्यमंत्री व मंत्री राहिलेले अनुभवी या सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे विरोधकांचे सर्व डाव परतवून लावण्याची ताकत महाविकास आघाडी मध्ये आहे. विरोधकांना सर्व प्रकारे तोंड द्यायला आम्ही सक्षम आहोत, असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
धनंजय मुंडे व मुंडे कुटुंबियांच्या वतीने परळी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांसाठी येथील हालगे गार्डन येथे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुंडे बोलत होते.
निवडणूक लागली तर समोरच्याना उमेदवार मिळतील की नाही?
दरम्यान परळी नगर पालिका ही आपल्यासाठी केवळ एक सत्ता केंद्र नसून इथल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे ते एक माध्यम आहे. मी माझी स्वतःची विधानसभेची निवडणूक जितकी गांभीर्याने लढलो, त्यापेक्षा नगर पालिकेची निवडणूक अधिक गांभीर्याने लढणार आहे. मात्र इथे महाविकास आघाडी म्हणून लढताना समोरच्या विरोधी पक्षाला प्रत्येक वॉर्डात उमेदवार व बूथ वर माणसे देण्याची सुद्धा पंचाईत आहे, असा खोचक टोला नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लागवला.
दुसरीकडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळपास मागील एफआरपी थकवल्यामुळे गाळप परवाना नाकारला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस कुठे पाठवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अंबासाखर कारखाना या महिन्याच्या शेवटी पर्यंत सुरू करत असून, परळी मतदारसंघातील एकही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू देणार नाही, असा ठाम विश्वास मुंडेंनी व्यक्त केला.
मागील काळात कोविडमुळे व त्याअनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधांच्या काळात अनेक सण उत्सव नागरिकांना आपापल्या घरात बसून साजरे करावे लागले. पण यापुढे कोविड नसेल तर दिवाळी स्नेहमिलनाचा हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करू असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.