बीड मध्ये मराठा समाज आक्रमक, आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एल्गार…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये मराठा समाजाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. भाजपा नेते आ सुरेश धस यांच्या नेतृत्वात आज बीडमध्ये मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला. सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली.

    बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये मराठा समाजाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. भाजपा नेते आ सुरेश धस यांच्या नेतृत्वात आज बीडमध्ये मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला. सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. पुढे सुभाष रोड, साठे चौक, जालना रोड त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धडकला.

    आघाडी सरकार मराठा समाजाच आरक्षण टिकवण्यास सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत हा मोर्चा आज काढण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये हा दुसरा मोर्चा काढण्यात आला आहे. सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाल गंभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे मराठा समाजाची भावना उसळून येत आहेत. यावेळी व्यसपीठावर भाजपचे नेते आमदार सुरेश धस,भाजपचे आमदार लक्ष्मण पवार ,माजी आमदार आर टी जिजा देशमुख, मराठा आरक्षण मोर्चाचे समनव्यक तथा ऊसतोड कामगार चे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.