Miss Maharashtra Pratibha Sangale

बीड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकाविला आहे. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे(Miss Maharashtra Pratibha Sangale).

  बीड : बीड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकाविला आहे. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे(Miss Maharashtra Pratibha Sangale).

  बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या आहेत प्रतिभा सांगळे, त्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्याच कारणही तसंच पोलिस दलात कार्यरत असताना त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकाविलाय. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या 2010 साली बीडच्या पोलीस दलात कार्यरत झाल्या. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्यावर आहेत.

  प्रतिभा अनेक वर्षांपासून आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबर अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रणर अप होऊन मिस महाराष्ट्रापर्यंत मजल मारली आहे.

  केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही चांगल्या प्रकारे गाजवले आहे. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवलीय.

  पोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिलाय. या यशानंतर पोलिस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होतंय.

  हे सुद्धा वाचा
  • 2022