शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे

आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे.

    बीड : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. एकीकडे मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावर आघाडी सरकार गंभीर नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारने मराठा समाजाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाचा वापर केवळ सत्ता मिळविण्यासाठी खतासारखा केला जात असल्याचा आरोप यावेळी मेटे यांनी केला आहे.

    आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. एसबीसीएसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात यावी. कोपर्डीच्या भगिणीला न्याय द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत.