MLA Vinayak Mete's harsh criticism on Chief Minister Uddhav Thackeray

गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच काम बंद आंदोलन सुरू आहे. तर, बीड मध्ये मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला आमदार विनायक मेटे(MLA Vinayak Mete) यांनी रविवारी भेट दिली.  यावेळी मेटेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray ) यांना महाराष्ट्र चालवण्याचा काही अधिकार नसल्याचं म्हटले आहे.

    बीड : गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच काम बंद आंदोलन सुरू आहे. तर, बीड मध्ये मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला आमदार विनायक मेटे(MLA Vinayak Mete) यांनी रविवारी भेट दिली.  यावेळी मेटेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray ) यांना महाराष्ट्र चालवण्याचा काही अधिकार नसल्याचं म्हटले आहे.

    दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागतंय. त्यामुळे दिवंगत बाळासाहेबांना देखील मराठी माणूस दिवाळीच्या काळात अडचणीत असल्याचे पाहून वाईट वाटत असेल असे विनायक मेटे म्हणाले.

    एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी एसटी आगारातच काळी दिवाळी साजरी केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आमदार मेटे यांनी यावेळी फराळ वाटप करून केला .