आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज आग्रही; ‘एक खत सीएम के नाम’ या मोहिमेच्या माध्यमातून “वर्षा” निवासस्थानी पाठवले दहा हजार पत्र

मुस्लिम समाजाने देखील आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी एकट्या बीड जिल्ह्यातून दहा हजार पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवस्थानी पाठवण्यात आलेत.

    बीड : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजासह ओबीसी समाज आक्रमक झाला असताना आता मुस्लिम समाजाने देखील आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी एकट्या बीड जिल्ह्यातून दहा हजार पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवस्थानी पाठवण्यात आलेत.

    दरम्यान सकल मुस्लिम समाज आणि पटेल फाउंडेशनच्या माध्यमातून ‘एक खत सीएम के नाम’ ही मोहीम हाती घेण्यात आलीय. मुस्लिम समाज मुख्य प्रवाहापासून वंचित असून त्यांना आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलीय.

    तसेचं आघाडी सरकारकडून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेल ही अपेक्षा आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यादरम्यान करण्यात आलीय. बीड जिल्ह्यातून सुरू झालेली मोहीम राज्यभर राबवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलंय.