Pankaja Munde At Jamil Paan Stall in beed

राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या नेत्यालाच 'लोकनेता' उपाधी मिळते, अगदी त्याचाच प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबाबतीत पुन्हा एकदा अनुभवास आला. पंकजा मुंडे यांनी बीडमधील जमील पान शॉपला भेट दिली(Pankaja Munde At Jamil Paan Stall in beed).

    बीड : राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या नेत्यालाच ‘लोकनेता’ उपाधी मिळते, अगदी त्याचाच प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबाबतीत पुन्हा एकदा अनुभवास आला. पंकजा मुंडे यांनी बीडमधील जमील पान शॉपला भेट दिली(Pankaja Munde At Jamil Paan Stall in beed).

    पंकजा मुंडे औरंगाबादहून परळीकडे जात होत्या. या दरम्यान बीडमध्ये आल्यानंतर पंकजा मुंडे बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला.

    पंकजा मुंडेंनी देखील होकार दित तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्या. पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले.