
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक आठवढ्यात तीन दिवसांच्या फरकेने गांजा च्या सामूहिक शेतीवर धाडी टाकून अंदाजे आडीज क्विंटल गांजा पकडण्यात आला. बीड जिल्ह्यात चक्क गांजाची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी तिघास अटक केली आहे.
बीड : बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक आठवड्यात तीन दिवसांच्या फरकेने गांजाच्या सामूहिक शेतीवर धाडी टाकून अंदाजे आडीज क्विंटल गांजा पकडण्यात आला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी तिघास अटक केली आहे.
दरम्यान आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील मोहा या गावात अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता, शेकडो एकर जमिनीवर अफूची शेती होत असल्याचे समोर आल्यानंतर शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते, आता याच तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात असलेल्या हेलंब या गावात गांजाची सामूहिक शेती केली जात असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी या शेतीवर छापा घातला असता सामूहिक गांजाची लागवड केल्याचे दिसून आले.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून अंदाजे दीड क्विंटल गांजा जप्त केला असून आरोपी विरोधात परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी मारोती मुंडे यांनी सांगितले.