Rape of a six-year-old girl in Mumbai

राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आनणारी घटना बीडमधून समोर आली आहे. सोळा वर्षांच्या (अल्पवयीन) मुलीवर(Minor Girl Raped By More Than 400 Persons In 6 Months) सहा महिन्यात 400 पेक्षा अधिक व्यक्तींनी अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

    बीड : राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आनणारी घटना बीडमधून समोर आली आहे. सोळा वर्षांच्या (अल्पवयीन) मुलीवर(Minor Girl Raped By More Than 400 Persons In 6 Months) सहा महिन्यात 400 पेक्षा अधिक व्यक्तींनी अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

    बीडमधील सामाजिक कार्यकर्ते तथा बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील कुंबेफळ थेथील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 हून अधिक लोकांनी अत्याचार केला आहे. ॉ

    लहान असतानाच आईचे छत्र हारवले. सात-आठ महिन्यांपूर्वी वडिलांनी अल्पवयातच लग्न लावून दिले. सासरी नवरा सांभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे राहायला आली. मात्र, वडिलांनी देखील तिला सांभाळण्यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे. तब्बल 400 हून अधिक लोकांनी लैगिक शोषण केल्याचे या मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी तक्रार देण्यासाठी गेली असता एका पोलीस कर्मचाऱ्यानेही तिचे लैंगिक शोषण केले.

    या प्रकरणामध्ये बीडच्या आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. असून तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. बलात्कार आणि बालविवाहाच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबतची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांनी दिली आहे. यात या मुलीच्या वडिलांचा देखील समावेश आहे.

    पीडित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्यांची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.